घरात घरात मजेशीर संवादांनी घरात पिकला हास्याचा मळा!
पहा 'बिग बॉस मराठी' सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

मुंबई २२ जानेवारी, २०२६ : 'बिग बॉस मराठी'च्या घरात जिथे एकीकडे वादाची ठिणगी पडली आहे, तिथेच दुसरीकडे राधा आणि सागर यांच्यातील मजेशीर जुगलबंदीने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होणार आहे. या दोघांनी 'सासू आणि सून' यांचे रूप धारण करत घरातील सदस्यांना चांगलेच हसवले आहे. बिग बॉस'च्या घरात राधा-सागरचा 'सासू -सून' ड्रामा  रंगणार असून त्याच्यातील मजेशीर संवादांनी घरात पिकला हास्याचा मळा.

काय आहे 'सास-सून' किस्सा?
राधाने मजेशीर रित्या सासूची भूमिका साकारली असून ती आपल्या सुनेच्या (सागरच्या) आणि घरातील इतर 'मॉडर्न सुनांच्या' तक्रारी करताना दिसत आहे. राधाच्या अस्सल मालवणी ढंगातील संवादफेकीने यामध्ये अधिकच रंगत आणली आहे.

मजेशीर संवाद :
राधा (सासूच्या भूमिकेत): "ह्या पोरी जरा कामाला मदत करत नाहीत, मी सगळं घर किती सांभाळू?" माळ हुकूम देत असतात. आणि तो सागऱ्या ... 
"सासूबाई, संपलं असेल तर जेवायला वाढा चला!"
राधा : या नवीन मॉर्डन  सुना आल्या आहेत, याना काही वळण नसल्यासारखं... अहो, "आमचं तर नाचकामच बंद पडल्यासारखा झालाय!" काय सांगू अजून...

घरात हास्याची कारंजी!
या संवादावर घरातील इतर सदस्यही पोट धरून हसताना दिसले. राधाची ही वेगळी शैली आणि सागरची तिला मिळालेली साथ यामुळे तणावाच्या वातावरणात काही काळ आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

पहा 'बिग बॉस मराठी' सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!