

पहा 'बिग बॉस मराठी' सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!


मुंबई २२ जानेवारी, २०२६ : कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'च्या घरात आता संघर्षाची ठिणगी पडली असून सदस्यांमधील संवाद आता वादात रूपांतरित होताना दिसत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवीन प्रोमोमध्ये राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात प्रचंड मोठे भांडण झाल्याचे समोर आले आहे.
प्रोमोमध्ये राकेश कमालीचा संतापलेला दिसत असून तो घरातील कामाच्या मुद्द्यावरून अनुश्रीवर निशाणा साधताना दिसतोय. "घरात एकही काम न करणाऱ्या मुलीचे आपण का ऐकून घ्यायचे?" असा प्रश्न राकेशने उपस्थित केला आहे. राकेशचा हा आक्रमक अवतार पाहून घरातील इतर सदस्यही अवाक झाले आहेत. दुसरीकडे, अनुश्रीनेही राकेशला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोघांमध्ये एकमेकांवर ओरडण्याची आणि 'चूप' राहण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. राकेश वारंवार तिला गप्प राहण्यास सांगत असताना अनुश्रीनेही त्याला तितक्याच प्रखरपणे उत्तर दिले आहे.


घरात शांत राहणारा राकेश यावेळी इतका का चिडला? या भांडणात कोणाची बोलती होणार बंद? हे पाहणे आता रंजक ठरणार आहे, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. पहा 'बिग बॉस मराठी' सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!





















