
पहा 'बिग बॉस मराठी' सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!
मुंबई २० जानेवारी, २०२६ : कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'च्या घरात खेळ आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. घरात प्रत्येक सदस्य स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असतानाच, आता 'कॅप्टन्सी' (Captaincy) वरून घरात मोठे वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोवरून यामध्ये दिव्या कॅप्टन्सी क्षमतेवर इतर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
दिव्याच्या क्षमतेवर घरच्यांचे प्रश्न
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर एकत्र बसले आहेत. यावेळी काही सदस्यांनी दिव्यावर थेट निशाणा साधला आहे. अनुश्री म्हणताना दिसतोय की, "दिव्या कॅप्टन्सीसाठी पात्र नाही," तर दुसरीकडे रुचिताने मत मांडले की, "कॅप्टन असा असावा ज्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे नीट ऐकून घेतले पाहिजे. त्यात सुमित आणि सागर यांचे म्हणणे पडले. दिव्या mature नाहीये अजून, "अनुभवाच्या जोरावर दिव्या इतरांपेक्षा थोडी कमी पडते.
"अनुभव जन्मत: नसतो...दिव्याचे घरातील सदस्यांना यावर रोखठोक उत्तर

घरातील सदस्यांनी लावलेल्या आरोपांनंतर दिव्या शांत बसलेली नाही. तिने आपली बाजू मांडली आहे. दिव्या म्हणते, "अनुभव जन्मतः कोणालाच नसतो. जर तुम्ही असं म्हणत असाल, तर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते!" दिव्याचा हा करारी बाणा पाहून आता घरातील समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे:
वादाचा विषय: दिव्या कॅप्टन्सी.
आरोप: घरच्यांच्या मते दिव्यामध्ये मॅच्युरिटी आणि अनुभवाची कमतरता आहे.
दिव्याचा पवित्रा: तिने एकटीने संपूर्ण घराला भिडण्याचे आव्हान स्वीकारले आहे.
आता दिव्या तिचे मुद्दे घरच्यांना पटवून देऊ शकेल का? की तिला या कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल? कोण बनणार घराचा कॅप्टन ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ - दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि कधीही JioHotstar वर.





















