



'बिग बॉस मराठी ६' च्या घरात पेटणार वादाचा वणवा!
पहा 'बिग बॉस मराठी' सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!
मुंबई २१ जानेवारी, २०२६ : कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी ६' च्या मध्ये आता खेळाने एक वेगळेच वळण घेतले आहे. घरातील वातावरण आता पूर्णपणे बदलले असून, केवळ शब्दांनी नाही तर आता ताकदीनेही सदस्य एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रोमोमध्ये राशनच्या गोण्यांवरून सदस्यांमध्ये अक्षरशः राडा झालेला पाहायला मिळतोय.

"राशनच्या गोण्यांचा तुटवडा, सदस्यांचा सुरू झाला झगडा!"
बिग बॉसच्या घरात राशन नेहमीच वादाचा मुद्दा असतो, पण यावेळी या वादाने आक्रमक रूप धारण केले आहे. प्रोमोमध्ये घरातील पुरुष सदस्य राशनच्या गोण्या पटकावण्यासाठी एकमेकांशी झोंबाझोंबी करताना दिसत आहेत. विशेषतः रोशन आणि ओंकार यांच्यात झालेली खेचाखेची घराचा थरार वाढवणारी आहे.
रोशनचे म्हणणे आहे, "पहिली गोणी मी घेतली आहे, ओंकार: "ए, ही गोणी मी पकडली होती आधी!" रोशन म्हणाला, "ए ओंकार, माझी सटकली ना तर मी ऐकत नसतो! मी खोटं नाही बोलो हे माझ्यासाठी 'रोजी-रोटी' आहे, मी उपाशी पण राहायला तयार आहे. असं म्हणत रोशनने ओमकारला ठणकावून सांगितले.
पुढे या टास्कमध्ये काय घडले ? हे नक्की पहा 'बिग बॉस मराठी' सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!





















